तळेरे (प्रतिनिधी): प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद,सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला व विभाग स्तरावर आपली चुणूक दाखविण्याची संधी प्राप्त केली. यावेळी कणकवली तालुक्याचे प्रतिनिधित्व तळेरे हायस्कूलने केले.माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांच्या हस्ते यश संपादित विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.या नाटिकेच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ कदम,जेष्ठ नाट्यकर्मी विकास कदम, अविनाश वाडये, सदर नाटिका दिग्दर्शक संतोष महाडिक यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्रशालेच्या सहा.शिक्षिका सुचिता सुर्वे,अजित गोसावी,पांडुरंग काणेकर,माजी विद्यार्थी साईश खटावकर यांचेही सहकार्य लाभले. नाटिकेतील सहभागी विद्यार्थी आर्या घाडी, राकेश भोगले, सावली पेडणेकर,मयुरी तळेकर,तक्षिल तळेकर,मयूर मेस्त्री,प्रांजल साटम,सुचित वरुणकर तसेच निधी पांचाळ,आर्या भोगले, वेदिका भोगले यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.याप्रसंगी तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, बाळा जठार,शाळा समिती सदस्य शरद वांगणकर,प्रवीण वरुणकर, संतोष जठार,निलेश सोरप,उमेश कदम,प्राचार्य अविनाश मांजरेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर,गणेश गाडी,दर्शन गाडी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,छ विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, चेअरमन अरविंद महाडिक यांनीही सुयश संपादित विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.