आ नितेश राणे यांच्या संकल्पनेतून प्राथ.आश्रमशाळा,बोर्डवे येथील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना बेड चे वाटप

विजय घरत यांचे शाल श्रीफळ देऊन मानले विशेष आभार

कणकवली (प्रतिनिधी): माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे, सिंधुदुर्ग संचालित प्राथ.आश्रमशाळा,बोर्डवे येथील शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना विजय घरत (सचिव-भाजपा ओबीसी,मोर्चा .दक्षिण मुंबई) यांच्या माध्यमातून बेड चे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बोर्डवे गावचे उपसरपंच महावीर साळवी,माजी सरपंच राजेंद्रकुमार मोडक, माजी सरपंच गजानन शिंदे, कृष्णकांत आडीवरेकर, लक्ष्मण घाडीगावकर, उमेश घाडीगावकर,मुख्या. कर्पे सर, सहशिक्षक पालव सर,नाईक सर,श्रीमती गोसावी मॅडम,श्रीमती.उषा गोसावी (अधिक्षिका) यादव, सावंत, कर्मचारी ,पालक वर्ग व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी विजय घरत यांचे शाल श्रीफळ देऊन विशेष आभार मानले गेले.

error: Content is protected !!