जीवनदाता सामाजिक संस्थेने पाटील यांचा केला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी): पियाळी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक संगीता पाटील उर्फ साक्षी प्रशांत जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असून त्याबाबत ची कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. याबद्दल संगीता पाटील यांचा रोटरी क्लब चेंबूर आणि जीवनदाता सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मरणोत्तर आपला देह आरोग्यविषयक उपक्रमाला लाभून त्याचा समग्र मानवजातीला ला उपयोग व्हावा या उदात्त हेतूने पाटील यांनी मरणोत्तर देहदनाचा संकल्प केला आहे











