आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे केंद्राच्या एमएसईबी विभागाच्यावतीने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या प्रचारासाठी परिसंवाद आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पारंपरिक शिल्पकार आणि कारागिरांच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या या योजनेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग विश्वकर्मा सुतार समाज बांधवाच्या वतीने विश्वकर्मीय सुतार समाज राज्य समन्वयक आनंद मेस्री व जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश मेस्री यांच्या हस्ते व विश्वकर्मा सुतार समाज जिल्हाध्यक्ष शरद मेस्री, कृष्णा मेस्त्री, राजू मेस्त्री, महेश मेस्त्री, बाळकृष्ण मेस्त्री, विठोबा सुतार, रितेश सुतार, नारायण सुतार, शंकर मेस्त्री, रामदास मेस्त्री, मधुसूदन मेस्त्री, सोमा मेस्त्री, अंकुश मेस्त्री, रामचंद्र मेस्त्री, शेखर मेस्त्री, विजय मेस्त्री आदी समाज बांधवांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, विश्वकर्मा प्रतिमा देवून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय अतिरिक्त सचिव डॉ रजनीश, व्यवस्थापक ए आर गोखेले, सेक्रेटरी अतिश सिंग, खादी विभागाच्या आर विमला, अनुजा बापट, अतिरिक्त विकास अधिकारी अश्विनी लाल, रुक्मिणी अत्री, नरेंद्र, कार्तिकेय सिन्हा, बँक ऑफ महाराष्ट्र जनरल मॅनेजर सुजित नायर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, परिविक्षाधीन आय ए एस विशाल खत्री, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, अजित गोगटे, लीड बँक व्यवस्थापक मुकेश मेश्राम, राजकुमार सिंघ बहुसंख्य बाराबलुतेदार बांधव आदी उपस्थित होते.