प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठान किर्लोस यांच्यावतीने 28 आँक्टोबरला स्नेह मेळावा…!

प्रतिनिधी (आचरा) : मालवण तालुक्यातील किर्लोस गावातील प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवार दिनांक 28 आँक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता, विजयालक्ष्मी मंगल कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र शेजारी, किर्लोस येथे कोजागिरी स्नेहमेळावा, देणे समाजाचे सोहळा कृतज्ञतेचा कार्यक्रम माधव गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप मान्यवरांचे स्वागत, पुरस्कार वितरण सोहळा-सहस्र चंद्र दर्शन पुरस्कार, विशेष विद्यार्थी पुरस्कार(भजन संप्रदाय), किर्तन साधना पुरस्कार, किर्तन-दिंडी व गायन असा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रियदर्शनी ग्रामविकास प्रतिष्ठान, किर्लोसच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!