खारेपाटण रामेश्वर नगर सखी महिला मंडळ फुगडी संघाचे विविध स्पर्धात यश

तालुका -राज्यस्तरीय फुगडी स्पर्धेत सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील रामेश्वर नगर येथील सखी महिला मंडळाने गावामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात नेहमी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या पारंपरिक फुगडी या लोककला खेळाचे जतन करून त्याचे अनेक ठिकानी सार्वजनिक कार्यक्रमात सादरीकरण केलेले आहे.नुकतेच या महिला मंडळाच्या यशाबद्दल रामेश्वर नगर वासियांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण या महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू, आश्रमभेटी,श्रावण महिन्यात मंगळागौर, हादगा अश्या सारखे विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवते .मंडळातील महिलांना झिम्मा फुगडी गाणी यांची आवड असल्याने सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.सौ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ अनुजा ठाकुरदेसाई यांच्या शिकवणीतून एक ते दोन महिन्यांच्या कालावधीतच सखी महिला मंडळ फुगडी संघ पारंगत झाला.
आचरा तोंडवली श्रावण महिन्यात घेतलेल्या या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथमच भाग घेऊन या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त. देवगड चा प्रसिद्ध खवळे गणपती समोर फुगडी सादरीकरनाची मोठी संधी मिळाली.मालवण -आचरा श्री इनामदार रामेश्वर मंदिर येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. खारेपाटण येथे विष्णू मंदिरात बालगोपाळ मंडळाचे यंदा २९ वे वर्ष निम्मित फुगडी सादर करण्याची संधी मिळाली.तसेच झुंझार मित्रमंडळ खारेपाटण नवरात्रोत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.तर राजापूर -गुरव वाडी ,नवरात्रोत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबरोबरच राजापूर, तुळसुंदे किंजळादेवी नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे..तसेच महिन्या भरातच सखी महिला मंडळ फुगडी संघाच्या यशाचे कौतुक म्हणून रामेश्वर नगर जिजामाता नगर नवरात्रोत्सव मंडळाने सखी महिला मंडळ फुगडी संघाचा नुकताच सत्कार करण्यात आला. केल.

या फुगडी संघामध्ये अनुजा ठाकूर देसाई, तृप्ती पाटील,प्रणाली कुबल,अमृता कुबल,मनाली होनाळे, शुभांगी गुरव,अंजली कुबल,क्षितिजा धुमाळे, ऋता शिंदे,रंजना ब्रह्मदंडे, योगिता राऊत,जान्हवी सुतार,शीतल कापसे,स्वप्नाली कांबळे, प्राजक्ता ठाकुरदेसाई, अनुप ठाकुरदेसाई,यांचा सहभाग होता. ढोलकी साथ-अथर्व जाधव यांनी दिली.तर आयुष मांगले, वाहतूक व्यवस्था-केतकी ट्रॅव्हल्स चे श्री भाऊ राणे या सर्वांचा महत्वपूर्ण सहभाग या फुगडी संघाला लाभला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!