मोदी सरकारचे काम आणि शेकऱ्यांसाठीच्या योजना आम्ही त्यांना समजावून देवू
दिवाळीचा बोनस सिल्वर ओक मधून मिळावा म्हणून राऊत यांच्या उठाठेवी
कणकवली (प्रतिनिधी): ह्यापूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विचार कधीच केला नाही.आज जेवढ्या योजना मोदी सरकारने आणल्या आहेत.त्याचा आढावा घ्या. 2000 रुपया प्रमाणे वर्षाला 6000 रुपयांचे अनुदान शेकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार देत आहे त्याची सुद्धा चर्चा करा. शेती प्रधान असलेला आपला देश 2030 ला तिसऱ्या क्रमांकावर असेल.असा त्यांचा संकल्प आहे.आम्ही केलेल्या विकासकामांची खुल्या व्यासपीठावर चर्चा होउदे. संजय राऊत येऊंदे पवारांचा पट्टा गळ्यात घालून मग उद्धव ठाकरे असताना सुद्धा महाराष्ट्रात कशा पद्धतीने वाट लावली याचा हिशोब करू असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले.उद्धव ठाकरेंच्या कामगाराला पवार साहेबांची जेवढी चिंता आहे. तेवढी चिंता उद्धव ठाकरेंची दिसत नाही. अशी मागणी केली. सामना वृत्त पत्र ठाकरेंचा आहे. मात्रा संजय राजाराम राऊत हा पगार ठाकरेंचा घेतो आणि चाकरी सिल्वर ओक वर पवारांची करतो. दिवाळीचा बोनस सिल्वर ओक मधून मिळावा म्हणून आजचा अग्रलेख आहे काय असा सवा आमदार नितेश राणे यांनी केला. मोदी साहेबांनी केलेली टीका जेवढं पवारांच्या कुटुंबाला झोंबत नाही तेवढं उद्धव ठाकरेच्या कामगाराला झोंबत.टिपू सुलतान चा पुतळा उभारण्यासाठी शासकीय निधी वापरला ज्यांनी ही हिम्मत दाखवली अशा देश द्रोही आमदारावर कारवाई होईल मोदी साहेबांची स्क्रिप्ट तुझ्या मालकासारखी 10 जनपथ वरून येत नाही. जेवढ काम मोदींनी केले. तेवढे काम तुझी नवीन मालकीनींनी जी 10 जनपथ वर आहे तिने केले नाही.काल भाजपच्या पुन्हा येईल या ट्विट मुळे उद्धव ठाकरेंना ,राऊत सह अनेकांची झोप उडाली. विरोधक घाबरले.असा डर सुद्धा चांगलाच आहे. एका ट्विट ने ह्यांच्या आयुष्यात भीती पसरली आहे. तुम्ही महायुतीत कधी येताय हे आधी वडेट्टीवार यांनी जाहीर करावे.नाना पटोलेना त्यांचा पक्ष कधी डिलीट करेल ह्यावर त्यांनी लक्ष द्यावे. संजय राऊत ला गोपनीय माहिती आपल्या प्रमाणे सांगून मोठेपणा मिरवतात याचा अर्थ मोदी साहेबांच्या घरात भांडी घासायला असतो काय हा राऊत अशी टीका केली.आदित्य ठाकरे याला अटक होणार आणि उद्धव ठाकरे व कुटुंब कायम लंडन ला राहायला जाणार असेही यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले