खारेपाटण पंचशील नगर येथे १०वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे सभासद दिवंगत प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खारेपाटण पंचशील नगर व सम्यक नगर येथील बौद्ध समाजातील १०वी /१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ नुकताच ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी पंचशील नगर, खारेपाटण येथील बुद्धविहारात सरपंच प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म.रा.विद्युत पारेषण कंपनीचे अभियंता किशोर मर्ढेकर ,युनिक ऍकॅडमी कणकवली ब्रंच चे व्यवस्थापक सचिन कोर्लेकर,पंचशील विकास मंडळ मुंबई चे उपाध्यक्ष विनोद पाटणकर,सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमांचे आयोजक संतोष पाटणकर,बौध्दजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे माजी अध्यक्ष्य यशवंत कांबळे गुरुजी, बौ.से.संघाचे विद्यमान सहसचिव सागर पोमेडकर,पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे उपाध्यक्ष जितेंद्र कदम,संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा आंकांशा पाटणकर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत पाटणकर, मधुकर पाटणकर, बौद्धचार्य संतोष पाटणकर,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पंचशील विकास मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर व विद्युत अभियंता किशोर मर्ढेकर साहेब यांचे शुभहस्ते खारेपाटण पंचशील नगर व सम्यक नगर येथील बौद्ध समाजातील १०वी/१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्याची भेटवस्तू देऊन विशेष गौरव व सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विधान विनोद पाटणकर,पार्थिव भूपेश पाटणकर, कु.जागृती संतोष पाटणकर, कु.अक्षता बाळकृष्ण पाटणकर,कु. नम्रता राजेश जाधव तर ईयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी श्रवण संतोष पाटणकर,कू.मनस्वी संजय साटविलकर व पदवी परीक्षा उत्तीर्ण कू.अंकिता बाळकृष्ण पाटणकर या शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. “एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील किती विद्यार्थी शिक्षित झाले व कोण कोण हुद्यावर कार्यरत आहेत यावरून ठरत असते.त्यामुळे बौद्ध समाजातील मुले ही गुणवत्ता मध्ये कुठेच कमी नाहीत.हे आज दिसून आले.हीच आपल्या समाजाची खरी प्रगती आहे.”असे भावपूर्ण उदगार खारेपाटण प्राची ईसवलकर यांनी विद्यार्थी गुण गौरव समारंभात बोलताना काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!