उद्योजक बाप्पा मांजरेकर यांची ९ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक

खोट्या सह्या करून मांजरेकर यांच्या कंपनीच्या नावे बँकेत केले प्रकरण

बँक अधिकारी आणि एका कंपनीच्या संचालका विरोधात बाप्पा मांजरेकर यांनी केली फसवणुकीची तक्रार

मुंबई चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी करत आहे अधिक तपास

मुंबई (प्रतिनिधी) : बनावट कागदपत्रांद्वारे साडेनऊ कोटींचे कर्ज मंजूर करून घेतल्याप्रकरणी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर आणि जनकल्याण सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणातील तीन अधिकाऱ्यांविरुद्ध चेंबूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांच्या तक्रारीवरून जयंत म्हैसकर तसेच जनकल्याण सहकारी बँक अधिकारी वीरेश शिंदे, अजय प्रभू आणि श्रीराम दातेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जनकल्याण सहकारी बँकेचे कर्ज प्रक्रियेतील तीन अधिकारी व अन्य वेक्ती यांनी खोटी कागदपत्रे तयार केली. मांजरेकर आणि पत्नी योगिता मांजरेकर यांच्या खोट्या सह्या करून ते बँकेत सादर केले. याच कागदपत्रांच्या आधारे जनकल्याण सहकारी बँकेकडून यशयोग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि.च्या नावे ९ कोटी ४५ लाखांची कर्ज उचल दाखवून दुसऱ्याच व्येक्तीला पैसे देवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
२६ मार्च २०१९ रोजी ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. यशयोग ही एमईपीची रस्त्याच्या कामादरम्यान सबकंत्राटदार कंपनी होती. गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला चेंबूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नागराज मजगे यांनी दुजोरा देत आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!