मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा
खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी उपोषणासह मोर्चे, आंदोलने निघत आहेत. याच पार्श्वभूमीवर खारेपाटण पंचक्रोशी येथील सकल मराठा समाज बांधव श्री देव नरसिंह मंदिर खारेपाटण येथे मंगळवार दि.३१/१०/२०२१ रोजी सायं.५.०० वा. एकत्र येऊन शांततेत बैठक घेत.मराठा समाज बांधवांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण व आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्रात सद्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठाला असून काही ठिकाणी उग्र स्वरूपाचे वळण आंदोलनांनी घेतले आहे.मात्र कोकणात शांततापूर्ण वातावरणात मराठा आरक्षण बाबत रॅली कडून पाठिंबा दर्शविला जात आहे.
खारेपाटण येथील सकल मराठा समाज बांधवांची सभा नुकतीच खारेपाटण गावचे माजी सरपंच व मराठा समाजाचे विभागातील नेते रमाकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव नरसिंह मंदिरात संपन्न झाली. यावेळी खारेपाटण पंचक्रोशीतील खारेपाटण,नडगिवे,वायगणी,शेर्पे, कुरगवणे, बेर्ले, चिंचवली आदी गावातील सुमारे ५० सकल मराठा समाज बांधव या मीटिंगला उपस्थित होते. सद्या आरक्षणाचे वास्तव व सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.तर काही समाज बांधवांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचे उदाहरण सांगितले.व आरक्षणाची आपल्या समाजाला का आवश्यकता आहे.यावर चर्चा केली.
सदर मीटिंग मध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने येत्या ५ नोव्हेंबर २०२३ रोजी खारेपाटण ते चिंचवली – बेर्ले – शेर्पे – कुरंगवणे – नडगिवे – वायंगणी मार्गे खारेपाटण अशी भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असल्याचे समाज बांधवांकडून सांगण्यात आले.तर या रॅलीचे विसर्जन खारेपाटण एस टी बस स्थानक येथे मराठा आरक्षण लढ्यात आजपर्यंत ज्यांचे बलिदान गेले अशा सर्व मराठा समाज बांधवांच्या स्मरणार्थ त्यांना भावपूर्ण सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सगण्यात आले.तर खारेपाटण विभागाची मराठा समाज बांधवांची कोअर कमिटी देखील यावेळी निर्माण करण्यात आली.
दरम्यान आता मराठा आरक्षण मिळणे हे मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला असून सरकारने मराठ्यांच्या सहन शिलतेचा अंत पाहू नये.व शांततापूर्ण वातावरणात चाललेले आंदोलन बिघडवू नये.असा इशारा” यावेळी समाज बांधवांच्या वतीने शासनाला देण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा “… “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे “… अशा घोषणा देखील देण्यात आल्या. तसेच मनोज जरागे पाटील यांनी मराठा समाज बांधवांच्या बाबतीत केलेल्या मागण्यांना समर्थन जाहीर करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाज बांधव ऋषिकेश जाधव, सुनील कर्ले, विजय सावंत,अनिल कर्ले,बबलू पवार,जगदीश सावंत,रघुवीर राणे, राजू अफंडकर,चंदू शिंदे,बबलू बाबरदेसाई,विजय देसाई,संदीप सावंत,सुधाकर कर्ले,राजू राऊत,अतुल कर्ले,रोहिदास शिंदे,दिगंबर राऊत,दिगंबर भालेकर, शेखर शिंदे,सुबोध देसाई,शिवाजी राऊत,तेजस राऊत आदी प्रमुख बांधव मीटिंगला उपस्थित होते.