आचरा (प्रतिनिधी): जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली दत्ता सामंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उबाठा आमदार वैभव नाईक यांना धक्का दिला असून सरपंच पदासह भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. मालवण तालुक्यातील सर्वात मोठी असणारी आचरा ग्रामपंचायत भाजपाने स्वतःच्या ताब्यात घेतली आहे.भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडिस यांनी ठाकरे सेनेच्या मंगेश टेमकर यांचा मोठ्या मताधिकय्याने पराभव केला आहे. सरपंच पदासह ग्रा पं सदस्यपदी 11 जागांवर भाजपाचेच कमळ फुलले असून एकहाती भाजपाची सत्ता आणली आहे.