आ. नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अमोल तेली, बंड्या नारकर यांचा करिष्मा
देवगड (प्रतिनिधी) : फणसगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील लक्षवेधी विठ्ठलादेवी ग्रा पं निवडणूकित सत्ताधारी ठाकरे सेनेला भाजपाने पराभवाची धूळ चारत चारही मुंड्या चित केले आहे. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली आणि विठ्ठलादेवी येथील कट्टर राणे समर्थक भाजपा कार्यकर्ता महेश उर्फ बंड्या नारकर यांनी करिष्मा केला असून सरपंच पदासह सर्वच्या सर्व 7 सदस्य पदाच्या जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणले आहेत. ठाकरे सेनेचे माजी जि प सदस्य प्रदीप नारकर यांच्या विट्ठलादेवी गावातील ग्रा पं निवडणूकित ग्रामस्थांनी ठाकरे सेनेला सपशेल नाकारून ठाकरे सेनेचा सुफडा साफ केला आहे.