एस.टी.महामंडळाचे ३८३ चालक-वाहक उमेदवारांच्या हाती नियुक्ती पत्रे

राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश ; देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : चालक तथा वाहक पदी भरती प्रक्रियेची सन २०१९ साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पात्र उमेदवारांना वाहन चाचणी, वैद्यकीय तपासणी सारख्या पुढील भरती प्रक्रीयेसाठी बोलविण्यात आले होते. या दरम्यान कोव्हीड कालावधी मुळे निवड झालेल्या ३८३ कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली न्हवती. निवड झाली चाचण्या, तपासण्या झाल्या पण नियुक्ती पत्र हातात नसल्याने या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत निवड झालेल्या उमेदवारांनी माझी भेट घेतली होती.

याबाबत तात्काळ राजेश क्षीरसागर यांनी दोन महिन्यापूर्वी एस.टी.महामंडळाच्या विभाग नियंत्रकांशी बैठक घेवून आढावा घेत, हा प्रश्न दोन महिन्यात निकाली काढण्याची ग्वाही दिली होती.गेल्या दोन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रश्नी मार्ग काढण्याबाबत मागणी केली होती. त्याचबरोबर एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश आले असून, सन २०१९ च्या जाहिरातीतून निवड झालेल्या ३८३ चालक तथा वाहक उमेदवारांची नियुक्ती पत्रे एस.टी.महामंडळाकडून काढण्यात आली.

आज देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात उमेदवारांना या नियुक्ती पत्राचे वाटप शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ येथे करण्यात आले.यावेळी निवड झालेल्या उमेदवारांशी बोलताना देवस्थान समितीच्या मा.कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी, एस.टी.महामंडळाच्या समस्यांबाबत राजेश क्षीरसागर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. प्रवाशांचे प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न यातून शासनाकडून सातत्याने शासन दरबारी मांडून न्याय देण्याचे काम केले आहे. सौंदती सारख्या लाखो भाविकांच्या यात्रेस विशेष यात्रेचा दर्जा मिळवून देवून एस.टी.महामंडळ व भाविकांच्यात नेहमीच सामंजस्य ठेवले आहे. आगामी काळातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर एस.टी. महामंडळाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असतील. नियुक्ती पत्रे मिळालेल्या उमेदवारांनीही प्रवाशी आपले आई-वडील, नातेवाईक मानून सेवा बजावावी, असा आपुलकीचा सल्लाही दिला. यासह एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना, प्रवाशांची सुरक्षा व प्रवाशांच्या सोई सुविधा याबाबत कार्यक्षम रीत्या कार्यरत राहून, एस.टी. वाहनांच्या दुर्घटना टाळण्यास कटिबद्ध रहावे, अशा सूचना केल्या. यावेळी उपस्थित नियुक्ती पत्र मिळालेल्या उमेदवारांनी आभार मानले.
यावेळी विभागीय वाहतूक नियंत्रक उत्तम पाटील, शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, नियुक्ती पत्र प्राप्त उमेदवार बाबुराव कांबळे, रविंद्र कांबळे, राहुल वांद्रे, इंद्रजीत डूम, संदीप पाटील, रणधीर कांबळे, शरद तळेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!