पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा “व्हाईस ऑफ मिडिया”ने केला निषेध

कणकवली (प्रतिनिधी) : व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हास्तरीय बैठक कणकवली येथे पार पडली. यावेळी रत्नागिरी येथील वादग्रस्त रिफायनरीच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियामार्फत निषेध व्यक्त करण्यात आला. वारीशे यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर संबंधित यंत्रणेने तातडीने कारवाई करून वारीशे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तत्पूर्वी शशिकांत वारीशे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

या बैठकीत “व्हॉईस ऑफ मीडिया” साठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले . यावेळी व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विजय गांवकर, कार्याध्यक्ष विवेक ताम्हणकर, सरचिटणीस राजन चव्हाण, सह सरचिटणीस श्रेयश शिंदे, उपाध्यक्ष स्वप्नील तांबे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!