कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे निबंध स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी विविध उपक्रम राबवणार्‍या कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे यंदाही विद्यार्थ्यांसाठी कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देवून पत्रकार पुरस्कार वितरण सोहळयात गौरविले जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या कणकवली तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पहिला गट- 5 वी ते 8 वी – विषय – स्वच्छता एक मिशन, माझ्या संकल्पनेतील आदर्श गाव. (शब्द मर्यादा 600 ते 1000), गट दुसरा – 9 वी ते 12 वी – विषय-जलसंवर्धन काळाची गरज, मोबाईल नसता तर… (शब्द मर्यादा 800 ते 1200). गट तिसरा 13 वी ते पदवीधर – विषय – भारताची महासत्तेकडे वाटचाल, प्लास्टिक मुक्त भारत (शब्द मर्यादा 1000 ते 1500). दोनपैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. पहिल्या गटासाठी अनुक्रमे रोख रु. 500, रु. 300, रु. 200 व प्रशस्तीपत्र, दुसर्‍या गटासाठी रोख रु. 700, रु. 500, रु. 300 व प्रशस्तीपत्र आणि तिसर्‍या गटासाठी रोख रु. 1000, रु. 700 व रु. 500 व प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी आपले निबंध सुवाच्य व स्वहस्ताक्षरात आपल्या नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबरसह येत्या 15 जानेवारीपर्यंत दै. पुढारी जिल्हा कार्यालय, कणकवली (बसस्थानकासमोर) किंवा अशोक करंबेळकर, कणकवली यांच्याकडे आणून द्यावेत असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे व पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!