खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेचा सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर, उपाध्यक्ष भाऊ राणे, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरुणकर तसेच सर्व संचालक मंडळ, तसेच खारेपाटण मधील प्रसिद्ध उद्योजक व प्रशालेचे माजी विद्यार्थी पवन कावळे, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, क्रीडाशिक्षक किरसिंग पाडवी,रामदास भिसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या क्रीडा महोत्सवामध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेते संघ पुढीलप्रमाणे – क्रिकेट स्पर्धा – ज्युनिअर कॉलेज विभागातील बारावी सायन्स विजेता तर अकरावी सायन्स हा संघ उपविजेता ठरला.कबड्डी स्पर्धा (८वी ते १०वी) ९वीअ चा संघ विजेता तर १०वी ब संघ उपविजेता ठरला. तर मुलींच्या कबड्डी गटामध्ये ८वीअ संघ विजेता तर ९वी ब संघ उपविजेता ठरला. जुनिअर कॉलेज कबड्डी स्पर्धा – ११वी टेक्निकल संघ विजेता तर १२वी अ संघ उपविजेता ठरला. तसेच जुनियर कॉलेज मुलींच्या गटामध्ये १२वी सायन्स संघ विजेता तर १२वी अ संघ उपविजेता ठरला.हॉलीबॉल स्पर्धा ९वी अ संघ विजेता तर १०वी अ संघ उपविजेता ठरला. तर जुनियर कॉलेज गटामध्ये १२वी सायन्स विजेता तर १२वी अ संघ उपविजेता ठरला.खो – खो स्पर्धा (५वी ते ७ वी गट) ७वी वर्ग विजेता तर ५वी संघ उपविजेता ठरला.मुलींच्या गटामध्ये ६वी संघ विजेता तर ७वी संघ उपविजेता ठरला.

तसेच बुद्धिबळ स्पर्धा (५वी ते ७ वी गट )अभिनव लक्ष्मीकांत हरयाण हा विजेता तर रितेश गोरक्षनाथ गायकवाड हा उपविजेता ठरला.८वी ते १० वी गट – चेतन कावळे विजेता.तर दुर्वेश नानीवडेकर हा उपविजेता ठरला. मुलींच्या गटामध्ये कु.ऋतुजा करंदीकर विजेती तर कु.प्राजक्ता ठाकूर देसाई उपविजेती ठरली. बुद्धिबळ स्पर्धा (ज्युनिअर कॉलेज गट) हर्ष लाड विजेता.तर रवी अडुळकर हा उपविजेता ठरला. मुलींमध्ये कु.रौनक डोंगरकर विजेती तर कु.मानसी तावडे उपविजेती ठरली. कॅरम स्पर्धा -(५वी ते ७वी गट) अहमद पावसकर विजेता.तर समर्थ जाधव उपविजेता ठरला. मुलींमध्ये कु.गीतांजली मांडवकर विजेती तर सृष्टी पतयान उपविजेती ठरली.८वी ते १० वी गटामध्ये निनाद तावडे विजेता. तर इमरान चौगुले हा उपविजेता ठरला. व मुलींच्या गटामध्ये कु.पूनम चांदीलकर ही विजेती ठरली.तर कु.मधुरा सरवणकर उपविजेती ठरली. कॅरम स्पर्धा ( जुनियर कॉलेज गट)कॅरम यश सुतार विजेता तर हर्ष लाड उपविजेता ठरला. मुलींमध्ये कु.दीक्षा चिके विजेती.तर कु.नर्गीस जवेरीया ही उपविजेती ठरली. बॅडमिंटन स्पर्धा (५वी ते ७वी गट) चिन्मय गुरव विजेता.तर ताजीम पटेल उपविजेता. मुलींमध्ये कु.ऋतुजा गायकवाड विजेती.तर कु.राधा ठाकूर देसाई उपविजेती. ८वी ते १०वी (गट) दुर्वेश नानिवडेकर विजेता.तर सिद्धार्थ पाडवी उपविजेता. मुलींमध्ये कु.हर्षदा झगडे विजेती.तर कु.गौरी सरवणकर उपविजेती. जुनिअर कॉलेज गटामध्ये फैसल काजी विजेता. तर संकल्प मांजरेकर उपविजेता. मुलींच्या गटामध्ये कु.नर्गीस झवेरीया ही विजेती. तर प्रियदा गुरव उपविजेती ठरली.

तसेच लांब उडी स्पर्धा (५वी ते ७ वी गट) सान्वी जामसंडेकर विजेती. तर आदिती मण्यार उपविजेती.मुलांमध्ये ताजीम पटेल विजेता.तर समर्थ जाधव उपविजेता. ८वी ते १०वी गट – मुलगे सुजल भालेकर विजेता.तर सुरज पाटील उपविजेता.मुलींमध्ये श्रुती जमसंडेकर विजेती.तर कु.अनुक्षा पतयान उपविजेती. जुनियर कॉलेज गट अहमद मुकादम विजेता. तर विराज सुतार उपविजेता. मुलींमध्ये तन्वी तोडकर विजेती.तर सायली पाष्टे उपविजेती. उंच उडी स्पर्धा ( ८वी ते १०वी गट)सुजल भालेकर विजेता.तर आदेश हरियाण उपविजेता.मुलींमध्ये .श्रुती जमसंडेकर विजेती. तर अनुक्षा पतीयान उपविजेती. जुनियर कॉलेज गटामध्ये सार्थक कुलकर्णी विजेता. तर प्रणव पवार उपविजेता.

गोळा फेक स्पर्धा (५वी ते ७वी गट) ताजीम पटेल विजेता.तर राहुल अडूळकर उपविजेता.मुलींमध्ये सिद्धी जमसंडेकर विजेती.तर प्रज्वला फाटक उपविजेती. ८वी ते १०वी दहावी गटांमध्ये अथर्व मोरे विजेता.तर साहिल शिंगाडे उपविजेता मुलींमध्येश्रावणी गुरव विजेती.तर ज्ञानेश्वरी गोसावी उपविजेती. जुनियर कॉलेज गटामध्ये प्रणव पवार विजेता.तर दुर्वांक ठुकरुल उपविजेता मुलींमध्ये साक्षी तावडे विजेती.तर दिशा ईस्वलकर उपविजेती.

थाळीफेक स्पर्धा (५वी ते ७वी गट) कु.सिद्धी जामसंडेकर विजेती. कु.ऋतुजा गायकवाड उपविजेती तर मुलांमध्ये ताजीम पटेल विजेता.तर रितेश गायकवाड उपविजेता.८वी ते १०वी गटांमध्ये साहिल शेंगाळे हा विजेता.तर अथर्व मोरे उपविजेता तर मुलींमध्ये अनुक्षा पतीयान विजेती ज्ञानेश्वरी गोसावी उपविजेती. जुनियर कॉलेज गटामध्ये वरून शिंदे विजेता. तर प्रणव पवार उपविजेता. मुलींमध्ये चंदना राठोड विजेती. तर साक्षी तावडे उपविजेती ठरली.

तसेच भालाफेक स्पर्धा (५वी ते ८वी गट) क्षितिजा लोकरे विजेती.व आनम खान उपविजेती मुलांमध्ये ताजीम पटेल विजेता.तर आदित्य गोसावी उपविजेता.८वी ते १०वी गटांमध्ये – सोहम पवार विजेता तर प्रतीक धुळप उपविजेता. मुलींमध्ये श्रुती जामसंडेकर विजेती.तर श्रावणी गुरव उपविजेती. जुनियर कॉलेज गटामध्ये विराज सुतार विजेता.तर प्रणव पवार उपविजेता व मुलींमध्ये कु.दिशा ईस्वलकर विजेती ठरली.

१०० मिटर धावणे स्पर्धा (५वी ते ७वी गट) ऋतुजा गायकवाड विजेती.तर क्षितिजा लोकरे उपविजेती.२०० मीटर धावणे ऋतुजा गायकवाड विजेती.तर कु. वेदिका पवार उपविजेती.४०० मीटर धावणे – वेदिका तावडे विजेती तर ऋतुजा गायकवाड उपविजेती ८०० मीटर धावणे सानवी जामसंडेकर विजेती.तर आनम खान उपविजेती ठरली.तर रिले ४०० मीटर धावणे इयत्ता ७वी मुली संघ विजेता ठरला.

मुलांमध्ये १००मीटर धावणे मयुरेश दर्पे हा विजेता.तर ताजीम पटेल उपविजेता.२०० मीटर धावणे मयुरेश दर्पे विजेता.तर सफवान काझी उपविजेता.४०० मीटर धावणे मयुरेश दर्पे विजेता.तर सफवान काझी उपविजेता ठरला.८००मीटर धावणे, समर्थ जाधव विजेता. तर मयुरेश दर्पे उपविजेता.तसेच ४००मीटर रिले मुलांमध्ये इयत्ता सहावी संघ विजेता ठरला.१०० मीटर धावणे मुलींमध्ये श्रुती जामसंडेकर विजेती.तर केतकी जाधव उपविजेती. मुलांमध्ये – साहिल पाटील विजेता तर प्रतीक धुळप उपविजेता. २००मीटर धावणे (मुलीं) त्रिवेणी परब विजेती.तर श्रावणी गुरव उपविजेती.मुलांमध्ये सौरभ तावडे विजेता तर साहिल पाटील उपविजेता 400 मीटर धावणे मुलींमध्ये ऋतुजा कदम विजेती.तर अनुष्का धुवाळी उपविजेती मुलांमध्ये वैभव भिसे विजेता.तर आदेश हरयाण उपविजेता ठरला. ८०० मीटर धावणे राज उन्हाळकर विजेता.तर वैभव रामदास भिसे उपविजेता तसेच ४०० रिले स्पर्धेत ९वी अ संघ विजेता ठरला.तर मुलींमध्ये ८वी अ संघ विजेता ठरला. हडल्स या प्रकारामध्ये मुलांमध्ये सुजल भालेकर विजेता.तर आदेश हरयाण उपविजेता ठरला.तर मुलींमध्ये अनुष्का पतयान विजेती तर हर्षदा नाखरे उपविजेती ठरली.तसेच १००मीटर धावणे ज्युनिअर कॉलेज गट मुलांमध्ये विराज विनोद सुतार हा विजेता तर अहमद मुकादम हा उपविजेता ठरला.तसेच मुलींमध्ये कु.दिशा ईस्वलकर विजेती तर सायली पाष्टे उपविजेती ठरली.

२०० मीटर धावणे मुलांमध्ये विराज सुतार विजेता ठरला तर अहमद मुकादम उपविजेता ठरला. मुलींमध्ये कावेरी कोंडविलकर विजेती.तर सायली पाष्टे उपविजेती ठरली.४००मीटर धावणे मुलांमध्ये प्रणय लाड विजेता.तर मयूर पवार उपविजेता तसेच मुलींमध्ये कु.साक्षी तावडे विजेती.तर कु.सायली पाष्टे उपविजेती ठरली.८००मीटर धावणे मुलांमध्ये अनिश जाधव विजेता तर विराज सुतार हा उपविजेता ठरला. मुलींमध्ये कावेरी कोंडविलकर ही विजेती.तर स्वरूपा पाडावे उपविजेती ठरली.रिले या प्रकारामध्ये १२वी अ संघ विजेता.तर ११वी सायन्स हा संघ उपविजेता तर मुलींमध्ये ११वी संघ विजेता. तर १२वी सायन्स हा वर्ग उपविजेता ठरला.

या सर्व विजेत्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सहसचिव राजेंद्र वरूणकर, तसेच सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. संपूर्ण क्रीडा महोत्सव खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!