आचरा (प्रतिनिधी) : देश-विदेशात भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणारे, आपल्या अमोघवाणीने जगाला मंत्रमुग्ध करणारे, तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तिमत्त्व, तरुणांना स्फूर्ति देणारा एक चिरंतन झरा “स्वामी विवेकानंद” यांची 161 वी जयंती चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेला उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, भटवाडी तलाठी शेजवळ, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, कविंद्र माळगावकर, समीर अपराज, सिद्धेश नाटेकर, सोनू पालकर, चेंदवनकर, लद्धे, पडवळ, आदी उपस्थित होते.