रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नगरपंचायत वाभवे वैभववाडी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेला तालुक्यातील विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नगरपंचायत वाभवे वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैभववाडी महोत्सव २०२४ या तीन दिवशीय कार्यक्रमाला आज तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेने सुरवात झाली. इ.१ ली ते ४ थी, ५ वी ते ८ वी , व ९ वी ते १२ वी अशा तिन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत तिन्ही गटात तालुक्यातील शाळांमधील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व स्पर्धकांना रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे प्रेसिडेंट संजय रावराणे, चार्टड प्रेसिडेंट संतोष टक्के, ट्रेझरर तेजस आंबेकर, सेक्रेटरी प्रशांत गुळेकर, रोटेरीयन पुजा सावंत, नेहा रावराणे, विद्याधर सावंत, सचिन रावराणे, मंगेश कदम, मिलिंद मेस्त्री,प्रशांत कुळये, नगरपंचायत वाभवे वैभववाडी चे सचिन माईणकर आदी मान्यवर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.