नौदल दिनी पोलीस दलाला सहकार्य केल्या बद्दल झाला सन्मान
आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय नौदल दिन 4 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार व महनीय व्यक्तीच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी अनेक व्यक्तींनी पोलीस दलाला सहकार्य केले होते. यामध्ये चिंदर सडेवाडी येथील हॉटेल व्यावसायिक विशाल गोलतकर यांनीही सहकार्य केले होते. या बद्दल आज सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.