गंधर्व फौंडेशन कणकवलीचे १९ फेब्रुवारी राेजी आयोजन! ; आशिये दत्तमंदिर येथे रंगणार साधना संगीत समारोह
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शास्त्रीय संगीताची अभिरूची वाढावी यासाठी गेले काही वर्ष सातत्याने गंधर्व फौंडेशन विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांची गायन वादन कला येथील रसिकांना अनुभवता आली आहे. याच धरतीवर पुन्हा एकदा साधना या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील युवा पिढीचे कलाकार या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत.
साधना या सांगीतिक उपक्रमात सुनाद राया कोरगावकर यांचे संवादिनी एकल वादन,किशोर तेली यांचे पखवाज एकल वादन व त्यानंतर प्रीती वारंग यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. त्यांना संवादिनी साथ आकाश जालमी, मालू गावकर करणार आहेत तसेच चैतन्य नाईक व अनिश कोंडुरकर हे तबला साथ करणार आहेत.
रसिकांसाठी मोफत असलेल्या या गॊमंतकीय कलाकारांच्या खास मैफिलीचा रसिकांनी आस्वाद घ्यावा व त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी गंधर्व फाउंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी आवाहन केले आहे.