वैभववाडीत आज दुपार पासून शहरातील स्टॉल हटवण्यास सुरुवात
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील शासकीय जागेतील स्टॉल हटविण्याबाबत नगरपंचायतने स्टॉल धारकांना नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडीत नगरपंचायत समोर स्टॉल धारकांनी काही दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. अखेर या प्रकरणी स्टॉल धारक व नगरपंचायत प्रशासन यांच्यात आमदार नितेश राणे यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला होता. शहरातील स्टॉल गुरुवारी स्वतः स्टॉल काढू असा शब्द स्टॉल धारकांनी आमदार नितेश राणे व नगरपंचायत प्रशासनाला दिलेला होता. स्टॉल धारकांनी आपला शब्द पाळला असून आज दुपार पासुनच स्वतः स्टॉल धारकांनी स्टॉल हटविण्यास सुरवात केली आहे.