चिंदर (प्रतिनिधी) : चिंदर दत्त मंदिर येथे गंगा पूजन कार्यक्रमा निमित्त आयोजित राम मंदिर संघर्ष-मार्गदर्शन कार्यक्रमात कारसेवक, राम मंदिर आंदोलनात प्रत्यक्ष दोन वेळा सहभाग घेणाऱ्या विलास हडकर यांनी काल राम, दत्त भक्तांना मार्गदर्शन केले.रामलंल्लाच्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या बहु प्रतिक्षित प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने सर्व प्रभू श्री राम भक्तांनी आपापल्या घराघरात व गावच्या मंदिरात सण-उत्सव साजरा करा असे आवाहन कारसेवक विलासजी हडकर यांनी केले आहे.
बारापाच मानकरी मधुकर पाताडे, दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्मिता पाटील, पंढरपूर यात्रे हुन आलेले बाबू परब, भूषण दत्तदास यांच्या हस्ते त्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी दामिनी पाताडे, विनिता मसुरकर, शमिका पालकर, सुनंदा परब, दिनेश पाताडे, विकास पाटील, संपदा पाताडे, हर्षदा परब, नम्रता परब, सुचिता राणे, दिनेश पाताडे, सुखस्वप्ना पवार, श्रीकांत कानविंदे, शंकर पालकर, विनया गोसावी, वासंती कानविंदे, विनायक मसुरकर, प्रभावती पाताडे,सुचिता अपराज आदी राम, दत्त भक्त उपस्थिती होते.