महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन आज वैभववाडी तालुक्यात अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी व आदर्श विद्यामंदिर भुईबावडा अशा दोन ठिकाणी करण्यात आले आहे. या परीक्षेत तालुक्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पायाभूत शिक्षणाबरोबरच सराव परीक्षेतून चांगले गुणवंत विद्यार्थी घडत असतात. आणि असेच गुणवंत विद्यार्थी भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये टिकतील असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. तर वैभववाडी तालुक्यात वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने काम केले जाते असे मत शिक्षक नेते सुनील चव्हाण सर यांनी व्यक्त केले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, मुख्याध्यापक बी.एस.नादकर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा पदाधिकारी सुनिल चव्हाण, संजय पाताडे, पी.डी.सामंत, प्रल्हाद रावराणे, तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे महादेव शेट्ये, रफिक बोबडे व अन्य शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.