धामापूर सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटेची श्रमदानातून डागडूजी

ग्रामपंचायत, जमीनमालक व ग्रामस्थांच्या समन्वयातून रस्त्याचे काम लागले मार्गी

सरपंच मानसी परब यांच्या प्रयत्नांना यश

चौके ( प्रतिनिधी ) : धामापूर मुख्य रस्ता ते सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटेचे धामापूर सरपंच मानसी महेश परब व ग्रामपंचायतच्या पुढाकाराने तसेच जमिन मालक आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून लोकहितकारी निर्णय घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी श्रमदानातून साफसफाई, डागडुजी व रूंदीकरण करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि जमीनमालक राजाराम (आबा) दामोदर धामापूरकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची श्रमदान करत साफसफाई केली आणि डागडुजी केली. व त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने वाटेचे रुंदीकरणही करण्यात आले. यावेळी उपसरपंच रमेश निवतकर, सुनिल चव्हाण, महेश धामापूरकर, महेश परब, एकनाथ धामापूरकर, राजन दाभोलकर, यश दाभोलकर, प्रकाश कांडरकर, अंकुश चव्हाण, प्रविण परब, प्रशांत परब, चंद्रकांत तळवडेकर, विश्वनाथ परब, वसंत परब, विलास मेस्त्री, दिनेश ठाकूर, कैवल्यप्रसाद महाजन, सुनिल देसाई, अविनाश नाईक आदी ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रमदानात सहभाग घेतला. दरम्यान या निमीत्ताने धामापूर ग्रामस्थांनी व जमिन मालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सरपंच मानसी परब यांनी सर्वांचे आभार मानले आणि धामापूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही असेच सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!