रानबांबुळी रेल्वे टॅक क्रॉस करताना अनोळखी महिलेचा मृत्य

डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने मृत्य

महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही

ओरोस (प्रतिनिधी) : रानबांबुळी अणावकरवाडी रेल्वे ब्रिजवर मालगाडी रेल्वेस पायी क्रॉस करताना धडकेत एक अनोळखी महिला वय अंदाजे 65 ते 70 वर्षे डोक्यास गंभीर दुखापत होऊन मयत झाली आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. या महीलच्या दोन्ही हातांवर टॅटू गोंदवलेल्या आहेत. अंगामध्ये जांभळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचे ब्लाउज असून दोन्ही हातामध्ये लाल रंगाच्या प्लास्टिकच्या बांगड्या, गळ्यामध्ये लाल सर्व पांढरे मणी असलेली माळ आहेत. या महिलेबाबत काही माहिती असल्यास ओळख पटवून, नातेवाईकांचा शोध होण्याकरता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!