बांदा पोलीस चेकपोस्टवर पर्यटकांना प्लास्टिक वस्तू महामार्गावर न फेकण्याबाबत जनजागृती करण्यात आली

बांदा (प्रतिनिधी) : स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने रविवारी बांदा पोलीस चेकपोस्टवर पर्यटकांना प्लास्टिक वस्तू महामार्गावर न फेकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तशा आशयाची पत्रके वितरीत करून पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात स्वच्छता मिशनचे सदस्य, बांदा पत्रकार व पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या या स्वच्छता जागराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, कास सरपंच प्रवीण पंडित, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, शेर्ले उपसरपंच दीपक नाईक, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, विकास केरकर, स्वराज्य प्रतिष्ठान बांदाचे अनिकेत वेंगुर्लेकर, बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक झांजुर्णे, स्वच्छता मिशनचे पत्रकार गणेश जेठे, मंडल अधिकारी दिलीप पाटील, तुषार नेवरेकर, मोहन पडवळ, प्रशांत सावंत, सचिन राणे, गुरु सावंत, प्रदीप फोपे, बाळ खडपकर, पी. एन. मठकर, कुंदे माजी सरपंच सचिन कदम, रोहित मोडकर, बांदा पत्रकार आशुतोष भांगले, नीलेश मोरजकर, मंगल कामत, प्रवीण परब, मयूर चराटकर, विराज परब, अजित दळवी, शैलेश गवस, यशवंत माधव आदी सहभागी झाले होते.

उपक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी गणेश जेठे यांनी उपस्थित मान्यवर व पोलीस कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. सरपंच प्रियांका नाईक यांनी उपक्रमाचे कौतुक केले. प्लास्टिक कचरा ही मोठी व भयावह समस्या बनली आहे. प्लास्टिकच्या अतिरेकामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. कचरा निर्मूलनासाठी बांदा शहरात गोवर्धन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

एपीआय विकास बडवे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. प्लास्टिक वस्तू तसेच पिशव्यांचा वापर टाळला पाहिजे. पर्यटकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग या संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. यावेळी राजाराम सावंत, सुरेश गावडे, गणेश जेठे, दिलीप पाटील, मयूर चराटकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या ३५० हून अधिक गाड्यांमधील पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यशवंत माधव यांनी केले. आभार मंडळ अधिकारी दिलीप पाटील यांनी मानले. पर्यटक व नागरिकांमधून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!