आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना(शिंदे गट) तालुका प्रमुख महेश राणे मित्रमंडळ यांच्यावतीने आचरा तिठा येथे आयोजित शिवजयंती उत्सवास आज मोठया दिमाखात सुरुवात झाली. आचरा सरपंच जॅरोन फर्नाडीस, उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सवला सुरूवात करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख महेश राणे, माजी सभापती राजू परुळेकर, रामेश्वर देवस्थानचे कपील गुरव, विभाग प्रमुख चंद्रकात गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, सोसायटी चेअरमन अवधुत हळदणकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफर मुजावर, महेद्र घाडी, चंदु कदम, अमर पळसंबकर सामाजिक कार्यकर्ते भाई घाडी,
केंद्रशाळा आचरा शालेय कमिटी अध्यक्ष बाबु परुळेकर, माजी सरपंच डॉ. प्रमोद कोळंबकर, मालवण खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, हॉटेल राज पॅलेसचे मालक राजन पांगे, अभी सावंत, बाबु धुरी, पत्रकार परेश सावंत, दादा बापारर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते जगदिश पांगे, उद्योजक अभय भोसले शालेय विद्यार्थी, शिवभक्त, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे स्वरसंदेश कराओके ग्रुप त्रिबंक संदेश रावले यांनी अप्रतिम सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली त्यांचा सत्कार ही करण्यात आला, बाळगोपाळ मित्रमंडळ आचरा वरचीवाडी यांनी हरिनाम दिंडीतून देखाव्यांच सुंदर सादरीकरण करत कार्यक्रमात अजूनच शोभा वाढवली त्यांचा मंडळाचा सत्कार करण्यात आला. रामेश्वर देवस्थान चे अध्यक्ष मिलिंद मिराशी व
निलेश सरजोशी यांचा सत्कार करण्यात आला.
संध्याकाळी सत्कार सोहळा 7 वाजता पोवाड्याचे सादरीकरण रात्रौ सत्कार व डबलबारी होणार आहे.












