नमो चषक २०२४ कॅरम स्पर्धेचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

भाजप युवामोर्चातर्फे स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष युवामोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांनी कॅरम खेळत केले. यावेळी नंदिता नितेश राणे, निमिष नितेश राणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, समीर सावंत, संजय कामतेकर, समीर प्रभुगावकर, मेघा गांगण, अभिजित मुसळे, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, सर्वेश दळवी, सागर राणे, अण्णा खाडये, कॅरम असोसिएशनचे योगेश फणसाळकर , पांडुरंग पाताडे, अनिल कंमार, राजेश निर्गुण , विजय इंगळे, प्रज्वल वर्दम, स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार, बाबू घाडीगावकर, रोहित ठाकूर, प्रथमेश दळवी, शामसुंदर दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!