काळसेत हळदीकुंकू आणि फनी गेम्स ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी पेंडूर यांच्यावतीने आयोजन

चौके (अमोल गोसावी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुका व महिला आघाडी पेंडूर यांच्यावतीने आज काळसे हायस्कूल येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू आणि मनोरंजनात्मक फनीगेम्स स्पर्धेला पेंडूर विभागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवजयंती निमित्त महिला आघाडी संघटक दिपा शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मान्यवर महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हळदीकुंकू घातल्यानंतर उपस्थित महिलांमध्ये संगीत खुर्ची , बादलीत चेंडू टाकणे यासारख्या मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्या महिलांना शिवसेनेच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.

यावेळी मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,उपतालुका प्रमुख बाळ महाभोज , संघटक महिला आघाडी श्वेता सावंत व दीपा शिंदे , विभाग प्रमुख वंदेश ढोलम , उपविभाग प्रमुख उमेश प्रभू, महिला उपविभाग प्रमुख जागृती भोळे , काळसे शाखा प्रमुख विनोद परब, पेंडूर शाखा प्रमुख निलेश हडकर, विभाग प्रमुख महिला लता खोत ,उपविभाग प्रमुख महिला शांती नाईक , काळसे सरपंच विशाखा काळसेकर, ग्रा. सदस्य मोनिका म्हापणकर, सुजाता परब, भाग्यश्री काळसेकर, खुशी राऊळ, तसेच पंचक्रोशी सरपंच व सदस्य , युवती प्रमुख निनाक्षी मेथर तसेच दर्शन म्हाडगुत, शिवनंदन प्रभू , परशुराम गुराम, चंद्रकांत राऊळ आदी शिवसेना पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!