कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा दि. 14 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11:00 वा. तहसिलदार कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला कणकवली तहसिलदार आर. जे. पवार सदस्य सचिव (अध्यक्ष) संगायो समिती, कणकवली गटविकास अधिकारी अरुण शांताराम चव्हाण, नगरपंचायत कणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, संजय गांधी नायब तहसिलदार प्रिया समीर परब, आय एच पेडणेकर अ.का. बी.आर जाधव अ.का. ए.ए. बागवे, महसूल सहायक हे उपस्थित होते.
सदर सभेमध्ये खालीलप्रमाणे प्रकरणे मंजुर करण्यात आलेली आहेत.
संजय गांधी निराधार योजना 74, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना गट अट 8, श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना गड ब 24, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना 8, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 3, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना 1 अशी एकूण 118 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.