चौके (प्रतिनिधी) : बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबण हातकंगले, कोल्हापूर येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदधिकारी यांनी या संघटनेचे सदस्य व मालवण तालुक्यातील चौके ग्रांमपंचायत नुतन सरपंच गोपाळ चौकेकर यांचा चौके येथे येत भेटवस्तू देत सपत्नीक सत्कार केला.
यावेळी या संघटनेचे तालुका अध्यक्ष धोंडीबा वाघमोरे यांनी बोलताना आपल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा सदस्य व सघटंनेचे क्रियाशील कार्यकर्ते गोपाळ चौकेकर हे चौके या गावातून जनमताने सरपंच म्हणून निवडून आले यांचा आनंद आमच्या संघटनेला झाला असून आम्हाला त्यांच्याप्रती अभिमान आहे. चौके गावासाठी त्यांच्याकडून अभीप्रेत कामे होतील या गावाबरोबर आमची संघटना सदैव गोपाळ चौकेकर यांच्या पाठीशी असेल अशा विश्वास व्यक्त केला.
यावेळी संघटनेचे जि. सदस्य वाल्मिक जाधव, माणिक दाभाडे, सगिंता जाधव, दिपक शिंदे, तानाजी मल्करी, सर्जेराव खोत, प्रसाद पाटील, प्रकाश शिंदे, करेबा माने, लक्ष्मण भोपळे, श्रीमंत माळी, सिकंदर जमादार, रमेश बेंद्रे, दयानंद पाटील यांच्या सह चौके ग्रामस्थ आणि ,गोपाळ चौकेकर यांचा परीवार उपस्थित होता. यावेळी कोल्हापूर येथून चौके येथे प्रेमापोठी खास सत्कार करण्यासाठी आलेल्या संघटनेच्या पदाधिकारी यांचे गोपाळ चौकेकर यांनी आभार मानले.