रात्रीच्यावेळी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुरुवारी रात्री शहरातील मोती तलावाच्या काठावर जोरदार “फ्री-स्टाईल” हाणामारी झाल्याची घटना घडून आली आहे. या हाणामारीचे कारण समजू शकले नाही. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निष्फळ ठरले. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ते प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. दोन्ही बाजूची तक्रार नसल्याने पोलीस डायरीत याची नोंद होवू शकली नाही. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शहरात काल रात्री 10 च्या सुमारास दोन युवकांमध्ये जोरदार मारामारी झाली. यात एक युवक किरकोळ जखमी झाला होता. मात्र त्या ठिकाणी असलेल्या अन्य युवकांनी त्यात सहभाग घेऊन तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरल्याने पोलीसानी हस्तक्षेप करीत त्यांना घेऊन ठाण्यात गाठले. दोघांची तक्रार नसल्याने हे प्रकरण मिटवण्यात आले. दरम्यान, शहरात पोलिसांनी रात्रीच्या वेळेस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी आता नागरिकांमधून होते आहे.












