अवैध दारूविक्री करताना जिमखाना मैदानावर गौरव सावंत ला एलसीबी जे रंगेहाथ पकडले

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील जिमखाना मैदानावर अवैध दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एकावर कारवाई केली. त्याच्याकडून १५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गौरव विलास सावंत, रा. जिमखाना, असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित सावंत हा अवैध दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. अचानक धाड टाकत त्याला रंगे हात पकडण्यात आले. तसेच त्याच्याकडून तब्बल पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयीता विरोधा अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!