महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी घेतले वरवडे गावी ग्रामदेवतेचे दर्शन

उद्या भरणार उमेदवारी अर्ज

उमेदवारी दिल्याबद्दल भाजप पक्षाच्या नेत्यांचे म्हणले आभार

अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास

कणकवली (प्रतिनिधी) :
भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे लोकसभा निवडणूक महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यावर नारायण राणे यांनी आपल्या गावी वरवडे येथे जात ग्रामदैवत श्री देव भैरवनाथचे सपत्निक दर्शन घेतले. दरम्यान माध्यमांशी बोलताना आपल्याला भाजपची उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व महायुतीतील नेत्यांचे आभार व्यक्त केले आहे.
यावेळी ते बोलताना म्हणाले, कोणतीही काम यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वप्रथम ग्रामदेवतेचे दर्शन घेतो. कोणतेही काम सुरू करायचे असेल तेव्हा किंवा कोणतीही निवडणूक लढवायची असेल तेव्हा प्रत्येक वेळी येऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतो. तसे आज देवतेचे

आशीर्वाद घेतलेले आहेत. रत्नागिरी – सिंधुदुर्ग च्या उमेदवारीवर कोणत्याही प्रकारचा तिढा नव्हता. ही पक्षाचा प्रक्रिया आहे. त्यामुळे जी काय मतदारांची मागणी होती ती सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आणि मला माहिती होतं की, उमेदवारी मलाच मिळणार, म्हणून मी प्रचार देखील अगोदर सुरू केला होता.

पुढे बोलताना ते म्हणाले, विकास हा मुद्दा आहे. मोदींचा मुद्दा! पहिला चारशे पार करून देशाची आर्थिक प्रगती व्हावी व भारत देश विकसित देश बनावा, आत्मनिर्भर भारत बनावा आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचं नारायण राणे यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत सौ. निलमताई राणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, शक्ती प्रमुख सदा चव्हाण, युवमोर्चा जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, बूथ प्रमुख आनंद घाडीगांवकर, अशोक राणे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!