कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय , कणकवली येथे शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी इन्फिप्रे (INFIPRE)कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. मुलाखतीसाठी इन्फिप्रे कंपनी कडून यतीन काणेकर (CEO),गौरवी सवाईकर ,सानिया गौन्स (प्रोजेक्ट मॅनेजर )व स्वानंद वझे (HR मॅनेजर )उपस्थित होते.
या मुलाखतीसाठी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्पुटर आणि ए आय एम ल अंतिम वर्षातील पात्र विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ऋतुल चिंदरकर आणि मदन पाटील या दोन विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना 25 हजार पर्यंत सॅलरी ऑफर दिली आहे.
एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संधी निर्माण करून दिली तसेच भविष्यात पण विदयार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी निर्माण करून देण्यास कटीबद्ध आहे.
एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २५ वर्षांपासून संस्थापक सन्मा. नारायणराव राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सन्मा. निलमताई राणे, ऊपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव सन्मा. नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व रोजगार ऊपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांच्या प्रयत्नांना संस्थेचे ही तितकेच पाठबळ मिळत आहे.
सदरच्या निवड प्रक्रियेकरीता अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट आँफिसर प्रा. सोमनाथ मेलसगरे यांनी विशेष प्रयत्न केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. निलमताई राणे, ऊपाध्यक्ष मा. निलेशजी राणे, सचिव मा. नितेशजी राणे,.प्राचार्य डाँ. डी. एस. बाडकर, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.