कार्याची पोचपावती देण्याची हीच ती वेळ! माजी सभापती उदय परब

मसुरे (प्रतिनिधी) : गेली 20 वर्षे सक्रिय राजकारणात असताना मला व माझ्या पत्नीला आमच्या कांदळगावचे सुपुत्र राणे साहेबांमुळे विविध पदे मिळाली. या पदांच्या माध्यमातून विविध विकासकामे, आरोग्य, शैक्षणिक आणि इतर स्तरावर जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. या 15 वर्षांच्या कालावधीत फक्त कांदळगावातीलच नव्हे तर जिल्हाभर सक्रिय असताना अनेक ग्रामस्थांची कामे झालेली आहेत ती निव्वळ राणे साहेबांमुळेच. आणि त्याची औपचारिक पणाने का होईना उतराई होण्याची ही माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला माध्यमातून संधी उपलब्ध झालेली आहे. सद्यस्थिती मध्ये मी सक्रिय राजकारणात नाही . मला जी पदे मिळाली त्याचे ऋण आयुष्यभर माझ्या स्मरणात रहाणार आहे. ज्यांची कामे खरोखरच झालेली असतिल त्या सर्वांनी एक पोचपावती म्हणून तसेच माझ्या वर कौतुकाची थाप म्हणून राणे साहेब यांच्या पाठी उभे राहणे आवश्यक आहे. स्वतः सह परिवार मित्र आप्तेष्ट यांनी राणे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन उदय परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!