Views: 62
ओरोस (प्रतिनिधी): सिंधूनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाचा २७ वा वर्धापनदिन मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त ओरोस फाटा येथील शिवाजी महाराज पुतळ्या जवळ रिक्षा स्टँड येथे सकाळी ८.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता तीर्थप्रसाद, दुपारी १ ते३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत स्थानिकांची भजने, सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत वारकरी सांप्रदायिक हरिपाठ, रात्रौ ९ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचा "दैव जाणिले कुणी" हा दणदणीत पौराणिक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.