नांदगाव वैश्य समाज वधू वर मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

400 वधू वर यांची नोंदणी

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज बांधव वधू वर सूचक मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे .याला महाराष्ट्र भरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथे संपन्न झालेल्या या मेळाव्यात जवळपास 400 वधू वर यांनी नोंदणी केली.

सदर मेळाव्यात कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नसून पूर्ण मोफत नोंदणी झाली असल्याने व सर्वांची नाष्टा भोजनाची व्यवस्थाही केलेली होती. या मेळाव्याला माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजन तेली, पर्यटन विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर,माजी नगराध्यक्षा मेघा गांगण ,गुरु मठ सिंधुदुर्ग अध्यक्ष अँड. दीपक अंधारी,नांदगाव सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर, कणकवली तालुका वैश्य समाजाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, कुडाळ उद्योजग राजन बोभाटे, वैश्य समाजाचे अध्यक्ष नागेश मोरये, कार्याध्यक्ष शशिकांत शेटये उपाध्यक्ष पंढरीनाथ पारकर, सचिव ऋषिकेश मोरजकर, सहसचिव दिलिप फोंडके, खजिनदार मारुती मोरये आदी सर्व महाराष्ट्र भरातून वधू वर व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव ऋषिकेश मोरजकर यांनी केले.,सुत्रसंचालन गजानन रेवडेकर, प्रतिमा पोकळे तर आभार अध्यक्ष नागेश मोरये यांनी मानले आहे.यानिमित्ताने आज सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथील कलाकार ‘मी भारतीय’ नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!