सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वस्तीगृहाच्या इमारती गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. आशिष गेहालयान (१९) असे त्याचे नाव आहे. तो मूळ हरियाणा-करणाल येथील होता. प्रॅक्टिकल सुरू असताना त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत देवरे अधिक तपास करीत आहेत.