खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्ती पत्र
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवासेना पक्षवाढीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. यामध्ये तळेरे युवासेना शहरप्रमुख पदी आदित्य महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली. खारेपाटण येथील जाहिर सभेत खासदार विनायकजी राऊत यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आदित्य महाडिक यांनी तळेरे शहरात जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार असे आश्वासन दिले.
यावेळी खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग -कोल्हापूर चे संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेशभाई पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व आदी शिवसैनिक उपस्थित होते.