कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आज प्रथमच सिंधुदुर्गात आगमन झाले. हेलिकॉप्टर ने राजापूर हेलिपॅड येथे मंत्री नितेश राणेंचे आगमन होताच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर्,युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडूलकर, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, अनिकेत नाईक, केदार खोत उपस्थित होते.