बुद्ध विहार येथे सकाळी 10 वाजता आंदोलन
कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल संसदेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुदगार काढून महामानावाचा अपमान केला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या कणकवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शिवसेनेकडून निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत दिली आहे.
भाजपच्या नेत्यांना अलीकडे सत्तेची धुंदी आली आहे. त्यामुळे हे नेते बेताल बडबड करीत आहेत. राष्ट्रपुरुषांना तसेच दलित बांधवाना तर भाजपच्या नेत्यांनी गृहीतच धरले आहे.राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने कोसळला. कणकवली येथे दलित बांधवांसाठी असलेल्या सामग्री वितरणात भ्रष्टाचार झाला. आता तर साक्षात बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली आहे.
बाबासाहेबांचे नाव घेण्याची हल्ली फॅशन आली आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. हा बाबासाहेबांचा अपमान आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून उद्या (शुक्रवार) कणकवली येथील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या आंबेडकर भवन बौध्द विहार येथे सकाळी 10 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी सर्व शिवसैनिक महिला सेना युवा सेना उपस्थित राहून अमित शाह यांचा निषेध करण्यांत येणार आहे,