जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन,पुणे यांचेकडून दिला जाणारा सन 2024 साठी मानांकित निवृत्ती सेवा राज्यस्तरीय पुरस्कार अनिल पाटील (IAS) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे शुभहस्ते भव्य सत्कारासह प्रदान करणेत आला. सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर असो सिंधुदुर्ग कुडाळ द्वारा जिल्हा स्तरावरील पेन्शनर मेळावा सन 2024 साठी सावंतवाडी संस्थान मराठा समाज सभागृह कुडाळ येथे दि 17 डिसेंबर 24 पेन्शनर डे चे औचित्य साधून आयोजित करणेत आला होता, कणकवली तालुका पेन्शनर असो अध्यक्ष म्हणून केलेली स्पृहणीय कामगिरी तसेच इतर अनेक बहुआयामी संस्थानद्वारे केलेली अतुलनीय सामाजिक सेवेचा गौरव म्हणून हा निवृत्ती सेवा पुरस्कार प्रदान करणेत आला यावेळी दादा कुडतरकर, सिंधुदुर्ग पेन्शनर संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर आंबेकर,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष रमेश पिंगुलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष चंद्रकांत अनावकर, सावळाराम अनावकर यांनी मनोगत व्यक्त केले तर अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, विरसिंग वसावे तहसीलदार कुडाळ यांनी यथोचित मार्गदर्शन केले,आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष शरद कांबळी तर सूत्रसंचालन सरमलकर यांनी केले. व्यासपीठावर सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. मेळाव्यास शेकडो पेन्शनर उपस्थित होते.