*विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार वितरण 22 डिसेंबर रोजी

कवयित्री सरिता पवार, कवी गीतेश शिंदे यांना पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्लेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कारांचे वितरण 22 डिसें 2024 रोजी नगर वाचनालय, वेंगुर्ला येथे सकाळी ११. ०० वा. करण्यात येणार आहे. विनोदिनी फाउंडेशन तर्फे मागविण्यात आलेल्या काव्यसंग्रहांमधून सन 2022-23 चा काव्य पुरस्कार कवयित्री सरिता पवार (सिंधुदुर्ग ) यांच्या “राखायला हवी नीजखुण या संग्रहाला तर सन २०२३-२४ चा पुरस्कार ठाणे येथील कवी गीतेश शिंदे यांच्या “सीसीटीव्हींच्या गर्द छायेत ” या काव्यसंग्रहाला प्राप्त झाला आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी चे मराठी विभाग प्रमुख प्रा.शिवराज गोपाळे व प्रसंवाद चे संपादक इंजि.अनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक वीरधवल परब, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य व साहित्यिक विठ्ठल कदम, सामाजिक कार्यकर्ते डॉ.रुपेश पाटकर, सुप्रसिद्ध निवेदक व कवी राजेश कदम, डॉ.सतीश पवार, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रा.प्रवीण बांदेकर, डॉ.सुनिल भिसे, मा. वृंदा कांबळी, मा. जनीकुमार कांबळे यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

या निमित्ताने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, जेष्ठ कवयित्री व नाट्य कलावंत कल्पना बांदेकर या संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे व कवी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील जाधव व सचिव राकेश वराडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!