खा. राऊत यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत.
इळये बौद्धवाडीत भाजपला खिंडार
देवगड ( प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वावर प्रभावी होऊन हा प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
देवगड येथे लोकसभा उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, सतीश सावंत, गौरीशंकर खोत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी शिवसैनिक उपस्थित होते.