ठाकरे गटाला धक्का ! वायंगणी सरपंच रुपेश पाटकर भाजपात

माजी खा.निलेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

आचरा (प्रतिनिधी) : सी वर्ल्ड प्रकल्पला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी वर्ल्ड प्रकल्प बाबत ठाकरे गटाने केवळ विरोधाचेच राजकारण केले. मतदार संघात तसेच राज्यातील सर्वच प्रकल्प बाबत जनतेला भडकवून राजकारण करणे. हेच काम ठाकरे गटाचे आहे. असा घणाघाती प्रहार भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटावर केला. दरम्यान सी वर्ल्ड प्रकल्पला ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता आमचाही प्रकल्पला विरोधच. हीच भुमिका आमची कायम राहील. असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ठाकरे गटाचे सरपंच रुपेश पाटकर यांसह अनेक ग्रामस्थानी भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. वायंगणी येथे आयोजित कार्यक्रमात सरपंच रुपेश पाटकर यांसह भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, ग्राप सदस्य मालती जोशी, शामसुंदरनाईक, सदस्य अर्चना सावंत, संजय सावंत, उमेश सावंत, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, राजन गावकर, दीपक सुर्वे, संतोष गावकर, दिपक पाटकर, रावजी सावंत, अण्णा धुळे, हनुमान प्रभू, बाळू वस्त, संतोष कोदे, डॉ. प्रमोद कोळंबकर, अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत, पंकज आचरेकर, मनोज हडकर, प्रफुल्ल प्रभू, सुशील शेडगे, उदय घाडी, प्रकाश मेस्त्री, मंगेश गांवकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक हनुमंत प्रभू यांनी करताना राणे साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राणे साहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!