पळसंब गावची देव डाळपस्वारी आज पासून सुरु !

आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंबची देव डाळपस्वारी आज शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सकाळी रितीरिवाजा प्रमाणे जयंतीदेवी मंदिरातून बाहेर पडून श्री देव आकारी ब्राह्मण, श्री देव रवळनाथ आणि श्री देवी पावणाई आणि श्री देव गांगेश्वर यांची भेट घेऊन देव स्वारी श्री रवळनाथ मंदिरामध्ये विसावली आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी देव स्वारी लोकांचे प्रश्न, पडस्थळ आणि शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

उद्या शनिवार 21 डिसेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजता देव स्वारी श्री रवळनाथ मंदिरातून बाहेर पडून श्री देव शेतशिवारा महापुरुष देव डिगीवाडी तसेच वाडीवरील भक्तगणांना दर्शन देऊन दुपारी डॉक्टर भोगटे यांच्या घरी महाप्रसादासाठी थांबणार आहे. त्यानंतर श्री देव नवगिरा,भूतोबा या स्थळांना भेटी देऊन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात येणार आहे.

त्यानंतर देव स्वारी वाटमार्गातील भक्तांना भेटी देऊन श्री देव सत्तावीस स्थळ या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर श्री देव आकारी ब्राम्हण मुळ पुरुष शेंबेकर या ठिकाणी भेट घेऊन खालचीवाडी येथे श्री पावणाई मंदिरात विश्रांती होणार आहे. रविवार 22 डिसेंबर रोजी खालचीवाडी येथून सकाळी 8 वाजता देव स्वारी मार्गस्थ होईल व आपकरवाडी महापुरूष देवस्थान येथे विश्रांती व तेथून गावठणवाडीतील मानकरी ग्रामस्थ यांच्या भेटी घेत रात्रीपर्यत ग्रामदेवता श्री. जयंतीदेवी मंदिरात विसावतील.

error: Content is protected !!