लळीत उत्सवाने चिंदर भगवती माऊली यात्रौत्सवाची सांगता !

पाच दिवसात हजारो भाविकांनी घेतले भगवती माऊलीचे दर्शन

आचरा (प्रतिनिधी) : वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलीच्या यात्रौत्सवाला गेल्या पाच दिवसात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पाच दिवस गावातील ओटी भरणे, नवस फेडणे, साकडे घालणे तसेच विविध भजन मंडळाची भजने, पुराण वाचन, कीर्तन, गोंधळ, आरती, भगवती उत्साही मंडळाची क्रिकेट स्पर्धा, चिंदर सेवा संघ आयोजित रक्तदान शिबीर, चिंदर ग्रामपंचायत आयोजित आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम आयोजित केले गेले. बुधवार 18 डिसेंबर रोजी लळीत उत्सव सकाळी विधिवत पूजे नंतर भक्तगणांना दर्शन दुपारी हळदी कुंकू समारंभ, श्री देव पिसाळी ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची सुस्वर भजने, पुराण वाचन, जय हनुमान पारंपरिक नाट्यमंडळ आरोस दांडेली यांचा ‘विंदय वासिनी विंदेश्वरी’ दशावतार नाट्यप्रयोग, गोंधळ, कीर्तन, आरती, दिवट्या नृत्य यांनी लळीत उत्सवाची व दिंडे यात्रौत्सवाची सांगता झाली.

error: Content is protected !!