दहावीचा निकाल २७ मे रोजी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल सोमवार 27 मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार ?

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

सीबीएसईनं काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता. महाराष्ट्रात सीबीएसईच्या तुलनेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.

दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!