होय ! मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतोय

माजी खा.निलेश राणेंनी पक्षप्रवेशाची केली घोषणा

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : होय मी उद्या 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे असे सांगत भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या शिवसेना पक्षप्रवेशा च्या चर्चेवर शिक्कामोर्तब केले. कुडाळ येथे सायंकाळी 4 वाजता जाहीर सभेत पक्षप्रवेश करणार असल्याचे निलेश राणे म्हणाले. ज्या चिन्हावर राणे साहेबांनी राजकीय कारकीर्द सुरुवात केली त्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवायची संधी मिळाली याचा आनंद आहे. 2019 साली भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला होता.भाजपात आदर मिळाला. भाजपा नेते फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे मला सांभाळले. अडचणीतून बाहेर काढले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही भावाप्रमाणे सांभाळले.भाजपच्या गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आदी सर्व नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आदर प्रेम दिले. भाजपात काम करण्याची शिस्त शिकायला मिळाली. लोकसभेत 27 हजारांचे लीड आम्ही घेतले आहे. ग्रामपंचायत मध्ये 90 टक्के विजय आम्ही युती मधून जिंकल्या आहेत.सहकार क्षेत्रातही आम्ही वरचढ आहोत. त्यामुळे जशी लोकसभा जिंकली. तसाच विजय विधानसभा निवडणुकीत मिळवणार आहोत असा विश्वास खा.निलेश राणेंनी व्यक्त केला.

error: Content is protected !!